Wednesday, 8 June 2022

Preposions in Marathi

 1. ABOUT


१) I was not talking about it. 

मी त्याबद्दल बोलत नव्हतो..


२) Don't worry about Hari. 

हरीची काळजी करू नकोस.


३) Do you have any money about you? 

तुझ्याजवळ काही पैसे आहेत का?


४) She is about 5 feet tall. 

ती जवळपास पाच फुट उंच आहे.


५) We reached at about 5.00 o'clock.

आम्ही पाचच्या सुमारास पोहोचलो.

 

६) I had gone there about three months ago. 

मी तिथे सुमारे तीन महिन्यांपूर्वी गेलो होतो.


2. ABOVE


१) There is a mirror above the washbasin.

वॉशबेसनवर आरसा आहे. 


२) They live above us.

ते आमच्या वर (= वरच्या मजल्यावर) राहतात. 


३) My name is above yours in the list.

यादीत माझं नाव तुझ्यावर आहे. 


४) An inspector is above a sub-inspector.

निरीक्षक उपनिरीक्षकापेक्षा मोठा असतो.


5) The temperature is likely to go above 40°C tomorrow. 

तापमान उद्या ४० से. च्या वर जाण्याची शक्यता आहे.


६) He is above stealing.

तो चोरी करण्याच्या कक्षेबाहेर/पलीकडे आहे (म्हणजे तो चोरी कधीच करू शकत नाही).


७) The above rules / address.

 वरील नियम / पत्ता.






3 ACROSS


१) My office is across the road.

 माझे ऑफीस रस्त्याच्या त्या बाजूला आहे..

(म्हणजे ऑफीसला पोहोचण्यासाठी मला फक्त रस्ता ओलांडावा लागतो.) 


२) Can you swim across this river? 

तू ही नदी पोहून ओलांडू शकतोस का?

(म्हणजे तू या नदीच्या या बाजूपासून त्या बाजूपर्यंत पोहू शकतोस का?


३) A new bridge is being built across the river, 

नदीवर नवीन पूल बांधला जात आहे.


4 ABOARD


We got aboard the bus / the train / the ship.


आम्ही बसमधे / आगगाडीत/जहाजावर चढलो.


15 AFTER


१) Do you believe in the life after death?

 मृत्यूनंतरच्या जीवनावर तुझा विश्वास आहे का?


२) After marriage, he became poor.

लग्नानंतर तो गरीब झाला.


३) He has been named after his grandfather..

त्याच्या आजोबाच्या नावावरून त्याचं नाव ठेवण्यात आलं आहे.


४) He was asking after you. 

तो तुझ्याबद्दल विचारत होता.


6 AGAINST


१) Everyone was against that decision.

प्रत्येकजण त्या निर्णयाविरुद्ध /च्या विरोधात होता.


२) It is against law to drive without licence. 

लायसन्सशिवाय गाडी चालवणं नियमाच्या विरुद्ध आहे.


३) Stand your bike against the wall. 

भिंतीला टेकून/ लावून सायकल उभी कर,


(४) This picture will look good against that wall.

 हे चित्र त्या भितीवर चांगलं दिसेल.



7 ALONG / ALONGSIDE


१) A road goes along the river.

नदीच्या बाजूने एक रस्ता जातो.


२) Vehicles were parked along the road. 

वाहने रस्त्याच्या बाजूने उभी केलेली होती.


३) Have you brought your diary along? 

तू तुझी डायरी सोबत आणली आहे का?


 ४) We will not work alongside them.

आम्ही त्यांच्यासोबत काम करणार नाही.


8 AMONG (= amongst)


दोनपेक्षा जास्त व्यक्ती अगर गोष्टींमधे असे दर्शवताना विशेषत: मनात निश्चित


संख्या नसताना among वापरतात. जसे,


He disappeared among the crowd.


तो गर्दीमधे दिसेनासा झाला.


9 AROUND


१) Photographers gathered around him. 

छायाचित्रकार त्याच्याभोवती जमले.


२) The earth moves around the sun.

पृथ्वी सूर्याभोवती फिरते.


३) He is around thirty.

तो जवळपास तीस वर्षांचा आहे.


 ४) The trees around your house are lush green.

तुझ्या घरासभोवतालची झाडे हिरवीगार आहेत.


५) We used to live around here last year. 

आम्ही मागच्या वर्षी इथेच जवळ राहत होतो.


10 AT


ठरावीक स्थान किंवा वेळ दर्शवण्यासाठी पुढीलप्रमाणे ठिकाण अगर वेळेपूर्वी at वापरतात. 

जसे,


१) He dropped me at the station.

त्याने मला स्टेशनवर सोडलं. 


२) The class starts at 6.00.

क्लास सहा वाजता / सहाला सुरू होतो.


३) I met him at the airport. 

मी त्याला विमानतळावर भेटलो.


४) There is someone at the door.

कोणीतरी दारावर आहे.


५) This train doesn't stop at Agra. 

ही ट्रेन आगऱ्यावर थांबत नाही.


६) Why are you looking at me? 

तू माझ्याकडे का पाहत आहेस?


७) He is good at mathematics but dull at all other subjects. 

तो गणितात चांगला आहे पण बाकी सर्व विषयांत ढ आहे. (अशाप्रकारे विशेषणानंतर at चा उपयोग त / मधे या अर्थाने केला जाऊ शकतो.)


८) The train was running at 150 kmph. 

ट्रेन ताशी १५० किमी वेगाने धावत होती.


९) He lost his sight at (the age of) 90.

नव्वदाव्या वर्षी त्याची दृष्टी गेली.


(१०) I will wait for you at the talkies.

मी तुझी टॉकीजवर बाट पाहतो... 


sout oud wachten


(म्हणजे टॉकीजमधे किंवा टॉकीजच्या परिसरात जसे, गेटवर वगैरे) फरक पहा :- 

I will wait for you in the talkies. मी तुझी टॉकीजमधे / टॉकीजच्या आत वाट पाहीन,


साधारणपणे लहान गावाच्या नावापूर्वी at व मोठ्या शहराच्या नावापूर्वी in वापरतात. जसे, He lives at Bhokar. तो भोकर येथे राहतो.


He lives in Mumbai. तो मुंबईत राहतो. ● एकाच वाक्यात पुढीलप्रमाणे दोन ठिकाणांची नावे असली तर लहान ठिकाणापूर्वी at


व मोठ्या ठिकाणापूर्वी in वापरावे.


उदा. He lives at Sadar in Nagpur. 

तो नागपूरमधे सदर येथे राहतो.



at असलेले काही वाक्प्रचार :


at least शेवटी, at first सुरुवातीला, at times कधीकधी, at a time एका वेळेस, at the / that time त्या वेळेस, तेव्हा, at any moment कुठल्याही क्षणी, at least कमीत कमी, किमान, निदान,


11 BEFORE


१) Think before speaking.


बोलण्यापूर्वी/आधी विचार करा.


२) Before marriage, he was rich.


लग्नापूर्वी तो श्रीमंत होता..


३) He stood up before a crowd of 100,000 people to give a speech. एक लाख लोकांच्या जमावासमोर तो भाषण देण्यासाठी उभा राहिला..


1 comment:

IRENIC Institute of English studies LLP said...

Nice Blog! Searching for spoken english coaching in Panchkula? We provide comprehensive training to improve fluency, pronunciation, and confidence in English communication. Designed for students, professionals, and individuals seeking better language skills, these courses focus on grammar, vocabulary building, accent neutralization, and real-life conversation practice. Experienced trainers use interactive methods, including role-playing, group discussions, and multimedia tools, to enhance learning. We cater to different proficiency levels, from beginners to advanced speakers. Whether preparing for interviews, public speaking, or general communication, these coaching centers offer flexible timings and personalized attention. For more information, click on the link.

Post a Comment

Use of ' have, has, had ' with example

I have - मला आहे, माझ्याकडे आहे I don't have - मला नाही आहे, माझ्याकडे नाही आहे. I had - मला होते, माझ्याकडे होते. I didn't have - म...